
बँकेने दिलेले शेअर कर्ज खात्यात जमा करण्यासाठी काढण्यात आलेला पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोर्चा काढण्यात आला.

गोंदिया , विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने काढण्यात आला भव्य मोर्चा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेयर बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्याच्या एक पत्र काढलेला आहे यामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना तसेच शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे त्यामुळे हा पत्र कायम स्वरूपी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन दि. २८/०३/२५ रोजी शुक्रवारला दु. १२-०४ वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी च्या वतीने गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला या वेळी पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी च्या वतीने करण्यात आली