शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट संकेत

जित पवार शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना".

मुंबई – राज्यात महायुती सरकार सत्तेत येऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विशेषतः शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत अस्वस्थता वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

कर्जमाफीबाबत अजित पवार यांची भूमिका स्पष्ट

28 मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज दोन दिवसांत फेडावे, असे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “सभागृहात उत्तर देताना मी आधीच सांगितले होते की सर्व काही करता येते, पण पैशाचे सोंग करता येत नाही. महाराष्ट्रातील जनतेला मी स्पष्ट सांगतो की 31 मार्चपर्यंत तुमचे पीक कर्ज भरणे आवश्यक आहे. पुढील तीन वर्षांसाठी कर्जमाफी देण्यास परिस्थिती अनुकूल नाही.”

यापूर्वीही पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, “तुम्ही माझ्या भाषणात कधी कर्जमाफीबद्दल ऐकले आहे का?” त्यांच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या अपेक्षा ठेवू नयेत, असे संकेत मिळाले होते.

सरकारची आर्थिक स्थिती आणि भावी योजना

सरकारच्या म्हणण्यानुसार, सध्याची आर्थिक परिस्थिती कर्जमाफीसाठी अनुकूल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. कृषी विकासासाठी नवीन उपाययोजना, अनुदान आणि पीक विमा योजना यांसारख्या पर्यायांवर भर दिला जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सरकारने शेतकऱ्यांनी भविष्यातील धोरणांकडे लक्ष देऊन आपल्या निर्णयांची आखणी करावी, असे सुचवले आहे. कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांना आता आर्थिक नियोजन करताना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. सरकारच्या भावी धोरणांवर शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

READ ALSO- वाहतूक नियमांचे उल्लंघन आता महागात पडणार! जाणून घ्या नवीन दंड शुल्क आणि शिक्षा – gondia today

Leave a Comment