विदर्भातील पहिला बलून बंधारा बननार बाघ नदिवर, 109 कोटींचा निधी मंजूर

gondia-balloon-dam-bag-river

गोंदिया: विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात बाग नदीवर रजेगाव येथे विदर्भातील पहिला बलून बंधारा उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने 109 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असून, यामुळे रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेला नवसंजीवनी मिळेल. सुमारे 10,000 एकर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा … Read more

गोंदिया: आवास प्लस योजनेत 43,536 कुटुंबांनी केली नोंदणी, हक्काच्या घरासाठी सेल्फ सर्वेक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

gondia awas plus yojna 25

गोंदिया, दि. 07 मे 2025: जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत आवास प्लस 2024 योजनेच्या माध्यमातून बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या योजने अंतर्गत तब्बल 43,536 कुटुंबांनी सेल्फ सर्वेक्षण करून घरकुलाची मागणी नोंदविली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

गोंदिया: अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

gondiacityt

गोंदिया, 6 मे 2025: गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतीपिकांसह ग्रामीण आणि शहरी भागातील मातीची घरे आणि गुरांचे गोठे यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी … Read more

मुंडिपार MIDC येथील व्यापाऱ्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसमोर मांडल्या विद्युत समस्या

gondiacity

गोंदिया, 6 मे 2025: आज दुपारी 12 वाजता MIDC मुंडिपार, गोंदिया येथील राईस मिल व्यापारी वर्गाने महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सुहास रंगारी यांच्यासोबत एका बैठकीद्वारे आपल्या विद्युत समस्यांचा पाढा वाचला. या बैठकीत व्यापाऱ्यांनी HT आणि LT कनेक्शनशी संबंधित समस्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी केली. यावेळी शुभलक्ष्मी राईस मिलचे मालक आणि राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. … Read more

गोंदिया: मुरदोली पांढरी फाटा येथे ट्रेलर पलटी, सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही

गोंडिया

गोंदिया, ५ मे २०२५: गोंदिया येथील मुरदोली पांढरी फाटा येथे आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक तांदूळ भरलेला ट्रेलर पलटल्याची घटना घडली. गोंदियावरून कोहमारा मार्गे जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, ट्रेलर तांदूळ घेऊन कोहमारा मार्गे जात होता. पहाटेच्या वेळी मुरदोली पांढरी फाटा येथे अचानक ट्रेलर पलटला. … Read more

सडक अर्जुनी: कुंभीटोला/बाराभाटी येथे हलबा-हलवी समाज संघटनेतर्फे सामूहिक विवाह सोहळा संपन्न

samuhik vivah sohla

सडक अर्जुनी, दि. ५ मे २०२५: कुंभीटोला/बाराभाटी येथे हलबा-हलवी समाज संघटनेच्या समितीने आयोजित केलेला सामूहिक विवाह सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून नववधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. हा कार्यक्रम आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्याला गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान … Read more

गोंदिया: खांबी व शिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अडचणींवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

गोंदिया, दि. 3 मे 2025: जिल्हा परिषद गोंदिया येथील स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहामध्ये आज खांबी व शिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अडचणी आणि उपाययोजनांबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान आयोजित या बैठकीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. या योजना सुरळीतपणे कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि निर्देश संबंधित … Read more

गोंदियाः रमजान ईदच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला दिल्या शुभेच्छा

गोंदिया, 31 मार्च: रमजान ईदच्या पवित्र पर्वावर गोंदिया शहरातील मुस्लिम समाज बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर आयोजित या विशेष कार्यक्रमात माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाला गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा अर्पण करण्यात आल्या. सांसद प्रफुल पटेल यांच्याकडून शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार श्री … Read more

अर्जुनी मोरगाव: नवेगावबांध येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आढावा बैठक संपन्न

अर्जुनी मोरगाव

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एमटीडीसी सभागृहात सिरेगाव बांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासंबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक 31 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता पार पडली. योजनांच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी चर्चा या बैठकीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा सुरळीत कारभार आणि नागरिकांना अखंडित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा … Read more

गोरेगाव सहकारी समितीत 1.43 कोटींचा गैरव्यवहार, चौघांना अटक

गोरेगाव धान खरेदी गैरव्यवहार , गोंदेखरी सहकारी समिति पुलिस कारवाई

गोरेगाव, 30 मार्च: गोरेगाव तालुका सहकारी खरिदी विक्री समिती मर्यादित अंतर्गत येणाऱ्या गोंदेखारी सर्वाटोला काली माठी येथील शासकीय आधारभूत धानखरिदी केंद्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपी रमेश वट्टी यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 1.43 कोटी रुपयांचा गैरव्यवहार संस्थेला मिळालेल्या करारनाम्यानुसार मिलर्सकडून धान उचल कमी देण्यात आल्याचे … Read more